विठ्ठल केणें मागेंपुढें – संत निळोबाराय अभंग – ३९६
विठ्ठल केणें मागेंपुढें ।
पिकें उघडें सुरवाडिक ॥१॥
एक ते घेती देती एक ।
तरि हें अधिक् भरलेंसे ॥२॥
युगें गेलीं करितां माप ।
निगमाहि अमूप नये माना ॥३॥
निळा म्हणे भाविकांजोगें ।
झालें हें अनुरागें आवडीच्या ॥४॥