सर्व तीथें चहुं भागें । होती अंगे सुस्नात ॥१॥ देवा उभा म्हणोनि तीरीं । सरोवरीं महिमा हा ॥२॥ सकळतीर्था अधिष्ठान । विटे चरण शोभले ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल म्हणतां । सायुज्यता घर रिघे ॥४॥