सुहास्य वदन तुटती – संत निळोबाराय अभंग – ३९४

सुहास्य वदन तुटती – संत निळोबाराय अभंग – ३९४

सुहास्य वदन तुटती तारें ।
पाउलें गोजिरीं विटेवरीं ॥१॥
कटावरीं ठेविले हात ।
आयुधें मंडित शंखचक्र ॥२॥
पीतांबर वेष्टीला कांसे ।
मेखळे ठसे जडिताचे ॥३॥
निळा म्हणे हदयावरी ।
पदक तमारि तेंवि झळकें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुहास्य वदन तुटती – संत निळोबाराय अभंग – ३९४