संतसनकादिक देव – संत निळोबाराय अभंग – ३८२
संतसनकादिक देव ।
भेटावया आले सर्व ॥१॥
देवा भक्तांते पूजितीं ।
महिमा अदभुत तो वर्णिती ॥२॥
पावन केली पुंडलिकें ।
म्हणती नरनारी बाळकें ॥३॥
निळा ऐकोनियां वाणी ।
मिठी घालूं धांवे चरणीं ॥४॥
संतसनकादिक देव ।
भेटावया आले सर्व ॥१॥
देवा भक्तांते पूजितीं ।
महिमा अदभुत तो वर्णिती ॥२॥
पावन केली पुंडलिकें ।
म्हणती नरनारी बाळकें ॥३॥
निळा ऐकोनियां वाणी ।
मिठी घालूं धांवे चरणीं ॥४॥