आतींचें आर्त होतें – संत निळोबाराय अभंग – ८५५

आतींचें आर्त होतें – संत निळोबाराय अभंग – ८५५

आतींचें आर्त होतें माझया मनीं ।
बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें ॥१॥
भरोनियां कोदंली चौदाहि भुवनें ।
सुतेज केलीं गगनें याचेनि तेजें ॥२॥
आवडीचें निज प्रकाशलें गुज ।
आतां नाचेन भोज येणें छंदें ॥३॥
निळा म्हणे दिशा व्यापूनियां मही ।
प्रकाश माझया देहीं संचरला तो ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतींचें आर्त होतें – संत निळोबाराय अभंग – ८५५