आटीतो आटणी । करुनि इंद्रियां दाटणी ॥१॥ कवळूनियां नामापाशीं । तुमच्या ठेवितों सायासी ॥२॥ नेदी घेऊं वावो । दुजा न देऊनियां ठावो ॥३॥ निळा म्हणे ज्योती । जागवितो दिवसराती ॥४॥