माझी बुध्दि झाली वेडी – संत निळोबाराय अभंग – ८३६
माझी बुध्दि झाली वेडी ।
दिधली बुडी हरिनामीं ॥१॥
नुमजे येथें विगुंतली ।
न करी बोली आणिक ॥२॥
सांडियले वादावाद ।
छंद बंद आणिक ॥३॥
निळा म्हणे तुमच्या पायीं ।
जडली ठायीं न ढळेसी ॥४॥
माझी बुध्दि झाली वेडी ।
दिधली बुडी हरिनामीं ॥१॥
नुमजे येथें विगुंतली ।
न करी बोली आणिक ॥२॥
सांडियले वादावाद ।
छंद बंद आणिक ॥३॥
निळा म्हणे तुमच्या पायीं ।
जडली ठायीं न ढळेसी ॥४॥