संत निळोबाराय अभंग

सैंध दाटली अक्षरें – संत निळोबाराय अभंग – ८३५

सैंध दाटली अक्षरें – संत निळोबाराय अभंग – ८३५


सैंध दाटली अक्षरें ।
माप नव्हें पुरें ।
केली माझीया दातारें ।
अतिवृष्टी कृपेची ॥१॥
लिहितां न पुरे दिवसराती ।
वाढविला विस्तार तो मती ।
जैसे क्षीराब्धीवरीं येती ।
तरंग मिरविती असंख्य ॥२॥
नाना प्रमेय नाना कथा ।
नाना पदांचिया चळथा ।
निघती त्या पंढरीनाथा ।
आवडती प्रियवादें ॥३॥
संतचरित्रें हरिचें गुण ।
केलें पवाडें ते विंदान ।
नाना पतितांचे उध्दरण ।
केलें संरक्षण दासांचें ॥४॥
ऐशिया स्तवनीं लाविली वाचा ।
बडीवार हरीचिया नामाचा ।
केला प्रतिपाळ तो दासाचा ।
वारंवार आठवितों ॥५॥
नाना नामें नाना चरित्रें ।
कल्याणरुपें अती पवित्रें ।
श्रवणें पठणें गातां वक्त्रें ।
हरिच्या पदातें पावविती ॥६॥
आइती जोडूनियां ठेविलीं ।
होतीं ठायींचि गुंफिलीं ।
निळा म्हणे तेचि वोपिलीं ।
माझिये वदनीं वरदानें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सैंध दाटली अक्षरें – संत निळोबाराय अभंग – ८३५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *