सेवकाचि परि स्थापिला पदीं – संत निळोबाराय अभंग – ८३४
सेवकाचि परि स्थापिला पदीं ।
मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥
तैसेंचि केलें मजही देवा ।
निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥
आईता वांटा दिधली जोडी ।
कवडीनें कवडी सांचिली ते ॥३॥
निळा म्हणे देवा आभारचि केले ।
मल सेवका गौरविलें आपुलिया ॥४॥