सुखीं सांठविलें सुख । हरिखा हरिख भेटविला ॥१॥ आनंदासी आनंद झाला । सद्गुरु भेटला तेचि क्षणीं ॥२॥ प्रतीतीसही प्रतीत झाली । शांति मेळवविली निजशांती ॥३॥ निळा म्हणे सुकाळ ऐसा । केला दशदिशा कोंदलीया ॥४॥