सिंधुतनया सेवितां पाय । तुमचे तल्लीन होउनी ठाय ॥१॥ ब्रम्हानंदाची राणीव । चरणरेणु माजी सर्व ॥२॥ म्हणे हे न विसंबें मी आतां । युगें कल्नकोटी जातां ॥३॥ निळा म्हणे सुकुमार ते । विटे सांपडलें आमुतें ॥४॥