सांपडली वाट । आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥ सहज वचनीं विश्वसतां । संतसंगती लांगता ॥२॥ वारलें दुर्घट । होतें भ्रांतीचें कचाट ॥३॥ निळा म्हणे सुखी । झालों पूर्विली ओळखी ॥४॥