सर्वकाळ तेंचि वाटे – संत निळोबाराय अभंग – ८२७
सर्वकाळ तेंचि वाटे ।
रुप पहावें गोमटें ॥१॥
जें कां पुंडलिकाचे व्दारी ।
उभें ठेलें विटेवरी ॥२॥
पितांबराचें परीधान ।
मुगुट कुंडले विराजमान ॥३॥
निळा म्हणे कौस्तुभ गळां ।
नाना पुष्पें तुळसीमाळा ॥४॥
सर्वकाळ तेंचि वाटे ।
रुप पहावें गोमटें ॥१॥
जें कां पुंडलिकाचे व्दारी ।
उभें ठेलें विटेवरी ॥२॥
पितांबराचें परीधान ।
मुगुट कुंडले विराजमान ॥३॥
निळा म्हणे कौस्तुभ गळां ।
नाना पुष्पें तुळसीमाळा ॥४॥