वाचा वेधलां हरिकीर्तनीं । श्रवण श्रवणीं गोडावले ॥१॥ नेत्रीं बैसलें हरीचें रुप । पूजनीं पडप उभय करां ॥२॥ प्रदक्षणें सोकलें चरण । आष्टांग आलिगंन नमस्कारा ॥३॥ निळा म्हणे हेंचि कोड । अवघिया चाड विठठलीं ॥४॥