वाम चरणीं वाहे नीर । गंगा अमृताचे पाझर ॥१॥ आवडे तें माझया मना । धणी न पुरेचि लोचना ॥२॥ महिमा जोडला मुद्रिका । ध्वज वज्र अंकुश उर्ध्वरेखा ॥३॥ निळा म्हणे मुंजुळ गाती । वाळे वांकी रुणझुणिती ॥४॥