ब्रम्हानंदा भरणी आली । तेचि केली सामोरी ॥१॥ वंचिलें नाहीं कोणापाशीं । होतें मानसीं धरिलें तें ॥२॥ अवघे नाम विठोबाचें । स्वरुप त्याचें ध्यानीं मनीं ॥३॥ निळा म्हणे देतां हांके । उभाचि ठाकें सन्मुख ॥४॥