बोलों जातां वचनाक्षरें – संत निळोबाराय अभंग – ८१७
बोलों जातां वचनाक्षरें ।
माजी संचरे निरोपण ॥१॥
ऐशी दाटली दाटणी ।
वाचा गुणी गुंडाळिली ॥२॥
नाना संकल्प ते मुराले ।
स्तवनींचि झाले सादर ॥३॥
निळा म्हणे निमिषोनिमिष ।
झाले श्वासोश्वास अक्षरें ॥४॥
बोलों जातां वचनाक्षरें ।
माजी संचरे निरोपण ॥१॥
ऐशी दाटली दाटणी ।
वाचा गुणी गुंडाळिली ॥२॥
नाना संकल्प ते मुराले ।
स्तवनींचि झाले सादर ॥३॥
निळा म्हणे निमिषोनिमिष ।
झाले श्वासोश्वास अक्षरें ॥४॥