बैसला तोचि माझिये ध्यानीं । कटीं कर दोन्ही वसवितां ॥१॥ नयनाचि माजीं नवचे दुरीं । आंतु बाहेरीं कोंदला ॥२॥ याविण नाठवे आणिक कांहीं । देहादेहीं तोचि तो ॥३॥ निळा म्हणे दिवसरातीं । स्वप्नीं सुषुप्तीं जागृतींत ॥४॥