बैसला तो ध्यानीं मनीं । पाहतां लोचनीं विठ्ठल ॥१॥ रुप गोजिरें सुंदर । वेधिलें अंतर मन बुध्दी ॥२॥ नाठवेंचि कांहीं आतां । त्याविण चित्ता दुसरें ॥३॥ निळा म्हणे लाविलें पिसें । मी मज नुमसे आठवितां ॥४॥