संत निळोबाराय अभंग

बैसला तो ध्यानीं मनीं – संत निळोबाराय अभंग – ८१५

बैसला तो ध्यानीं मनीं – संत निळोबाराय अभंग – ८१५


बैसला तो ध्यानीं मनीं ।
पाहतां लोचनीं विठ्ठल ॥१॥
रुप गोजिरें सुंदर ।
वेधिलें अंतर मन बुध्दी ॥२॥
नाठवेंचि कांहीं आतां ।
त्याविण चित्ता दुसरें ॥३॥
निळा म्हणे लाविलें पिसें ।
मी मज नुमसे आठवितां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बैसला तो ध्यानीं मनीं – संत निळोबाराय अभंग – ८१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *