बरवा झाला वेवसाय – संत निळोबाराय अभंग – ८१४

बरवा झाला वेवसाय – संत निळोबाराय अभंग – ८१४

बरवा झाला वेवसाय ।
चित्तीं आठवितां पाय ॥१॥
राम ह्रदयीं राहिला ।
परमानंद प्राप्त झाला ॥२॥
व्दैत तेंहि मावळलें ।
परब्रम्ह प्रकाशलें ॥३॥
निळा म्हणे धन्य झालों ।
गुरुकृपें स्थिरावलों ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बरवा झाला वेवसाय – संत निळोबाराय अभंग – ८१४