पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद ॥१॥ येऊनी एकांतीं उपदेशिलीं कानीं । बीजमंत्रें दोन्हीं निजाक्षरें ॥२॥ जीवा शिवा शेज रचिली आनंदीं । आउटावें पदीं आरोहण ॥३॥ निजीं निजरुपीं निजविला निळा । अनुहातें बाळा हल्लरु गाती ॥४॥