पुरातन मी शरणांगत – संत निळोबाराय अभंग – ८१०
पुरातन मी शरणांगत ।
आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥
म्हणोनि संत पाळिती मातें ।
देउनी भातें प्रेमरस ॥२॥
जेउनी उरला प्रसाद देती ।
निकट बैसविती जवळिकें ॥३॥
निळा म्हणे क्षणक्षणां ।
देती स्मरणा श्रीहरिच्या ॥४॥