पायीं लीन होता निळा । दिधला कळा प्रेमाची ॥१॥ निववूनियां केला सुखी । ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥ माउलीची ऐशी जाती । बालकां प्रीति समजावी ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । साक्षभूत अंतरींची ॥४॥