पायीं लीन होता निळा – संत निळोबाराय अभंग – ८०९
पायीं लीन होता निळा ।
दिधला कळा प्रेमाची ॥१॥
निववूनियां केला सुखी ।
ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥
माउलीची ऐशी जाती ।
बालकां प्रीति समजावी ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
साक्षभूत अंतरींची ॥४॥
पायीं लीन होता निळा ।
दिधला कळा प्रेमाची ॥१॥
निववूनियां केला सुखी ।
ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥
माउलीची ऐशी जाती ।
बालकां प्रीति समजावी ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
साक्षभूत अंतरींची ॥४॥