पडतांचि तें वचन कानीं । धरिती मनीं अत्यादरें ॥१॥ सुकृताचीं उत्तम फळें । आलीं एक वेळे ओढवोनि ॥२॥ सुखीं सांठवलें सुख । हरिखा हरिख भेटला ॥३॥ निळा म्हणे कल्प कोटी । पडली गांठीं हरीसवें ॥४॥