पडतांचि तें वचन – संत निळोबाराय अभंग – ८०८
पडतांचि तें वचन कानीं ।
धरिती मनीं अत्यादरें ॥१॥
सुकृताचीं उत्तम फळें ।
आलीं एक वेळे ओढवोनि ॥२॥
सुखीं सांठवलें सुख ।
हरिखा हरिख भेटला ॥३॥
निळा म्हणे कल्प कोटी ।
पडली गांठीं हरीसवें ॥४॥
पडतांचि तें वचन कानीं ।
धरिती मनीं अत्यादरें ॥१॥
सुकृताचीं उत्तम फळें ।
आलीं एक वेळे ओढवोनि ॥२॥
सुखीं सांठवलें सुख ।
हरिखा हरिख भेटला ॥३॥
निळा म्हणे कल्प कोटी ।
पडली गांठीं हरीसवें ॥४॥