नेटकेंचि दैव उघडलें आजीं । तो हा मजमाजीं संचरला ॥१॥ आतां कैसें करुं मी यासी । नावरेंचि मनासी आवरितां ॥२॥ सुदिन घटका सांपडली होती । ते पडिली अवचितीं हातीं याचे ॥३॥ निळा म्हणे मी मज माझें । हिरोनियां वोझें नेलें सकळ ॥४॥