नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं ।
नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं ॥१॥
आळवूनि वाचें याचीं उत्तम नामें ।
सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमें ॥२॥
धरुनियां रुप दृष्टीं हदयभुवनीं ।
सांठवीन आपुलिया मनाचे मननीं ॥३॥
निळा म्हणे जन्मोनियां केली हे जोडी ।
विठोबाचि सेवा नित्य नविये आवडी ॥४॥