नुठेचि मन वरुनियां – संत निळोबाराय अभंग – ८०४
नुठेचि मन वरुनियां ।
जडोनी ठेलें हरीच्या पायां ॥१॥
बुध्दि निश्येंसी राहिली ।
परम विश्रांति पावली ॥२॥
डोळे न धाती पाहतां ।
चरणीं विगुंतले तत्वतां ॥३॥
निळा म्हणे न पुरे धणी ।
करीन जीवें बोवाळणी ॥४॥
नुठेचि मन वरुनियां ।
जडोनी ठेलें हरीच्या पायां ॥१॥
बुध्दि निश्येंसी राहिली ।
परम विश्रांति पावली ॥२॥
डोळे न धाती पाहतां ।
चरणीं विगुंतले तत्वतां ॥३॥
निळा म्हणे न पुरे धणी ।
करीन जीवें बोवाळणी ॥४॥