नाहीं लौकिकाशीं काज । माझें गुज तो जाणें ॥१॥ अंतर्बाह्य ठावें तयां । येईल बाह्य पसरुनी ॥२॥ हाचि निश्चय माझा मनीं । विश्वास वचनीं संतांच्या ॥३॥ निळा म्हणे निर्भय चित्तें । भेटी त्यातें पाचारी ॥४॥