नाहीं लौकिकाशीं काज – संत निळोबाराय अभंग – ८०१
नाहीं लौकिकाशीं काज ।
माझें गुज तो जाणें ॥१॥
अंतर्बाह्य ठावें तयां ।
येईल बाह्य पसरुनी ॥२॥
हाचि निश्चय माझा मनीं ।
विश्वास वचनीं संतांच्या ॥३॥
निळा म्हणे निर्भय चित्तें ।
भेटी त्यातें पाचारी ॥४॥
नाहीं लौकिकाशीं काज ।
माझें गुज तो जाणें ॥१॥
अंतर्बाह्य ठावें तयां ।
येईल बाह्य पसरुनी ॥२॥
हाचि निश्चय माझा मनीं ।
विश्वास वचनीं संतांच्या ॥३॥
निळा म्हणे निर्भय चित्तें ।
भेटी त्यातें पाचारी ॥४॥