नाहीं कोठें गोंविला हेत – संत निळोबाराय अभंग – ७९९
नाहीं कोठें गोंविला हेत ।
ठेविलें चित्त याचिवरी ॥१॥
सगुण सुंदर देखिलें दिठीं ।
विटे नेहटी तेंचि पुरे ॥२॥
वामभागीं विराजमान ।
स्वरुपीं समान रुक्मिणी ॥३॥
निळा म्हणे लाभला छंद ।
याचाचि वेध मनासीं ॥४॥