नाहीं उपेक्षिलें कोणा । थोरा लहाना निवडुनी ॥१॥ ऐसी संत देती ग्वाही । पुराणेंही गर्जती ॥२॥ आम्ही आतां न फिरों मागें । करुं वेगें वेगुचि ॥३॥ निळा म्हणे पळें पळ । साधु काळ भेटीचा ॥४॥