न धरी आतां शंका । कशासाठी भिऊं लोकां ॥१॥ ज्याचें ओझें तयावरी । मज हे ऐशी काय थोरी ॥२॥ सांगितलें करुं काज । ज्याची तया चिंता लाज ॥३॥ निळा म्हणे गेलो भेवो । जाणोनि साह्य पंढरिरावो ॥४॥