न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥ निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥ भोक्ताचि नाहीं कैचा भोग । अनंगीं अभंग हारविलें ॥३॥ निळा म्हणे ठांई ठावो । देवीं देवो मावळला ॥४॥