न कळे केव्हां दिवस – संत निळोबाराय अभंग – ७९४
न कळे केव्हां दिवस गेला ।
रात्रीं झाला तमनाश ॥१॥
निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें ।
नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥
भोक्ताचि नाहीं कैचा भोग ।
अनंगीं अभंग हारविलें ॥३॥
निळा म्हणे ठांई ठावो ।
देवीं देवो मावळला ॥४॥