नाहीं माझा उरविला ।
संदेह अवघाचि फेडिला ॥१॥
म्हणोनियां त्याच्या सुखें ।
नाचें कीर्तनीं मी हरिखें ॥२॥
बोलविती जें जें वाचें ।
तें तें अक्षर निश्चयाचें ॥३॥
निळा म्हणे मी नेणें गति ।
अर्थ त्याचा ते जाणती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.