पशुमुखें ज्ञानेश्वर – संत निळोबाराय अभंग – 1578

पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥

तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥

मी तों मुळींचाचि मतिमंद । जाणोनियां भेद अंतरींचा ॥३॥

निळा म्हणे अंगिकार । केला जी वर देऊनियां ॥४॥


राम कृष्ण  हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.