चाडियामुखें दाणा पडे – संत निळोबाराय अभंग – 1576

चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥

तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥

सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निस्थानपदातें ॥३॥

वाचाळ ज्ञानें ऐकतां गौष्टी । वाउग्याचि शेवटीं भरोवरी ॥४॥

निळा म्हणे सांप्रदाय शुध्द । उपजवी बोध गुरु शिष्या ॥५॥


राम कृष्ण  हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.