संत निळोबाराय अभंग

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें – संत निळोबाराय अभंग – 1561

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥

चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥

चित्तेंविण चिंतणें बुध्दीविण जाणणें । मनेंविण अनुभवणें अनुभव्यातें ॥३॥

निळा म्हणे गगनें गगना आलिंगन । पवनासवें गमन पवना जेवीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *