पाहों जातां देखणे तेंचि – संत निळोबाराय अभंग – 1559

पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥

आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥

बुध्दीच्या प्रवेशें हरपे । मन जेथें संकल्पेंसहित विरे ॥३॥

निळा म्हणे चित्ता नुरे चित्तपण । आनंदा मुरवण आनंदें त्या ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.