पाहणें पाहातें – संत निळोबाराय अभंग – 1558

पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें ॥१॥

मीहि नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरबाहीं ॥२॥

उदो अस्तु सविता नेणें । जेथें तेथें आपुलेपणें ॥३॥

निळा म्हणे नर्भी नभ । जेवीं दावूनियां प्रतिबिंब ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.