संत निळोबाराय अभंग

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण – संत निळोबाराय अभंग – 1553

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥

अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥

नभा अवकाशा कोण भिन्न करी । वस्त्रतंतुपरी देव भक्त ॥३॥

निळा म्हणे प्राण तोचि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एकएका ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *