संत निळोबाराय अभंग

मी माझें पाहतां न देखेचि दिठी – संत निळोबाराय अभंग – 1552

मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥

टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥

मृगजळनदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडेंचि ॥३॥

निळा म्हणे कांति दिसे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुनी त्या ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *