बहुरुपी हा एकला – संत निळोबाराय अभंग – 1547

बहुरुपी हा एकला । नानाकारें नटें नटला ॥१॥

पुरुषाकृति स्त्रिया बाळें । होउनी कोणाही नातळे ॥२॥

नामें रुपें वस्त्राभरणें । रसस्वाद नाना खाणें ॥३॥

निळा म्हणे फळें पुष्पें । पर्णे मूळें भिन्नचि रुपें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.