पायीं चित्त हें राहिलें – संत निळोबाराय अभंग – 1543

पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥

मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥

बुध्दि बोध्दव्या मुकली । एकाकारता पावली ॥३॥

निळा म्हणे नाहीं देह । तेथें कैंचा तो संदेह ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.