संत निळोबाराय अभंग

सोनें असे सोनेपणें – संत निळोबाराय अभंग – 1541

सोनें असे सोनेपणें । अलंकार लेणें होय जाय ॥१॥

तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥२॥

नाना मृगजळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडीच ॥३॥

निळा म्हणे घटमठ मोडी । अवकाश परवडी नाहीं तया ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *