येती जाती  वर्षती मेघ – संत निळोबाराय अभंग – 1537

येती जाती  वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥

तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥

नाना नटिया नटवेष । परि तो आपणास भिन्न नव्हे ॥३॥

निळा म्हणे नानावस्त्राकार तंतु । दाउनी आपणांतु आपण ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.