जेविं देखोनि सकळां – संत निळोबाराय अभंग – 1532

जेविं देखोनि सकळां । आपणा न देखे हा डोळा ॥१॥

परि तो न म्हणावा कीं अंध । देखणाचि तो शुध्दबुध्द ॥२॥

अवधियांतें जाणे । जाणीव जेवी आपणा नेणे ॥३॥

निळा म्हणे आहे तैसा । आत्मा आपआपणा ऐसा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.